मुंबई : शिक्षकांचा बहिष्कार, बारावीच्या तब्बल 65 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून

Continues below advertisement
बारावीचे ६५ लाख पेपर तापसणीशिवाय पडून आहेत. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेने पेपर न तपासण्याची भूमिका घेतलीये. शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढल्याने प्राध्यापकांनी १२वीचा एकही पेपर तपासला नाहीये. त्यामुळे पेपर तपासणीचं कामकाज पुर्णपणे ठप्प आहे. शासनाने तातडीने आदेश न काढल्यास निकालावार झालेल्या परिणामाला सरकार जबाबदार असेल असंही संघटनेने म्हटलंय. शिक्षणमंत्री दाद देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा अशीही मागणी करण्यात येतेय. नियमानुसार ५ जूनपुर्वी १२वीचा निकाल लावणं आवश्यक आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram