115 वर्षांच्या आजीबाईंची गोष्ट | माझा स्पेशल | नागपूर | एबीपी माझा
शांती पांडे वय तब्बल 115 वर्षे....शांती आजींचा जन्म 12 मार्च 1903 रोजी झाला, मध्य प्रदेशातील सिवनीला त्या राहतात. सध्या पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे सर्जरीसाठी नागपूरच्या चांडक रुग्णालयात भरती झाल्या आहेत. पण आजीबाईंचं शरीर काटक आहे. अजूनही चष्मा नाही. ऐकायला थोडं कमी येतं. आजही आजीबाई आलेल्या गेलेल्यांचा हात पाहून भविष्य सांगतात आणि तोंडभर आशीर्वादही देतात.