VIDEO | आरक्षणाबाबत केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय | नवी दिल्ली | एबीपी माझा
देशातील आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे. देशातील ब्राह्मण, ठाकूर, भूमिहार, बनिया, जाट, गुजर या समाजांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. गेल्या 17 वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देण्याची मागणी होती. मात्र 10 आरक्षणामुळे 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाणार आहे. त्यामुळे हे आरक्षण कितपत टिकेल असा सवाल घटनातज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.