BJP Megabharti | भाजपची मेगाभरती; काँग्रेस राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवारांना धक्का देत ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वैभव पिचड आणि मधुकरराव पिचड यांनी भाजपचं उपरणं खांद्यावर घेतलंय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला. यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलं. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी ऐकायला मिळाली. नवी मुंबईच्या नाईक कुटुंबातील आमदार संदीप नाईक यांनी सागर नाईक यांच्यासोबत भाजपात प्रवेश केलाय. यावेळी त्यांच्यासह ५२ हून अधिक नगरसेवकांनीही राष्ट्रवादीला रामराम करत भाजपात पक्षप्रवेश केला. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलं.