Kapil Dev on Virat Kohli : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मागील काही काळापासून खराब फॉर्मात असल्याने त्याच्यावर टीका होत आहेत. इंग्लंडविरुद्धही चांगल्या फॉर्मात असलेल्या दीपकच्या जागी विराटला संधी मिळाली. ज्यानंतर टीका आणखी वाढल्या कपिल देव यांनीही विराटच्या जागी युवा खेळाडूंना संधी मिळावी असं वक्तव्य केल्यावर बऱ्याच चर्चांना उधान आलं, ज्यानंतर आता विराटचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी कपिल देव यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवत प्रतित्त्यूर दिलं आहे.


शर्मा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की,''कोहलीने 70 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली असून यातून त्याचं कौशल्य कळतं. कोणतीही मोठी गोष्ट घडली नसताना असं वक्तव्य का केलं आहे, कोहलीच्या बाबतीतच इतकी घाई का? मला वाटत नाही बोर्ड इतक्या लवकर त्याला बेंचवर बसवण्याचा निर्णय घेईल."


काय म्हणाले कपिल देव?


विराटच्या फॉर्मवर क्रिकेट जगतातून प्रतिक्रिया येत असताना  कपिल देव यांनी दिलेली प्रतिक्रिया बरीच चर्चेत आली. देव यांनी विराटबद्दल बोलताना म्हणाले,''आपण ज्या विराटला ओळखतो तसा खेळ त्याला खेळता येत नाही. विराटने धावा कराव्या असं मलाही वाटतं पण सध्या तो खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याच्यामुळे इतर चांगल्या युवांना संधी न मिळणं चूकीचं आहे. जर जगातील नंबर दोनचा आर आश्विन कसोटी संघाबाहेर बसू शकतो. तर नंबर एकचा विराट कोहलीही बाहेर बसल्यास काही चूकीचं नाही'' 


मागील अडीच वर्षात एकही शतक नाही


विराट कोहलीला गेल्या अडीच वर्षांत तिन्ही फॉरमेटमध्ये एकही शतक झळकावता आलं नाहीये. कोहलीनं त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा टी-20 सामना श्रीलंकाविरुद्ध यावर्षी फेब्रुवारीमध्ये खेळला होता. त्यानंतर आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी त्यानं विश्रांती घेतली. विशेष म्हणजे, आयपीएलमध्येही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आयपीएल 2022 मध्ये एकूण 16 सामन्यात फक्त 341 धावा केल्या. दरम्यान, टी-20 विश्वचषकाला काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. यामुळं विराट कोहलीचं फॉर्ममध्ये येणं भारतीय संघासाठी खूप गरजेचं आहे.


हे देखील वाचा-