Job Majha :  नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी महत्वाची बातमी आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  वर्धा बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि अहमदनगर महापारेषणमध्ये भरती निघातील आहे.  


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खासगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. पाहुयात वेगवेगल्या क्षेत्रांतील भरतीसंदर्भात... 


बृहन्मुंबई महानगरपालिका 


पोस्ट : समुदाय संघटक (community organiser)


शैक्षणिक पात्रता - B.A./ BSW, दोन वर्षांचा अनुभव, मराठीचं ज्ञान, MSCIT उत्तीर्ण


एकूण जागा : 113


अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहायक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, पाचवा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- ४०० ०२८


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 28 जून 2022


तपशील : portal.mcgm.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर For prospects मध्ये careers -all वर क्लिक करा. recruitment मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


पिंपरी चिंचवड महानगरपालिका


एकूण 64  जागांसाठी भरती होत आहे.


पोस्ट : उद्यान अधिकारी


शैक्षणिक पात्रता - B.Sc (ऍग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर), पाच वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 12


वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख :19 जून 2022


तपशील : www.pcmcindia.gov.in 


दुसरी पोस्ट : माळी  


शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, माळी कामाचा कोर्स, १ वर्षाचा अनुभव


एकूण जागा - 52


वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष


नोकरीचं ठिकाण : पिंपरी चिंचवड


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जून 2022


तपशील : www.pcmcindia.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर भरतीवर क्लिक करा. भरती जाहिरात पाहा... यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वर्धा


पोस्ट - प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर


सरकारच्या नामनिर्देशनुसार पात्रता हवी.


एकूण जागा : 37 (यात प्रोफेसर पदासाठी चार जागा, असिस्टंट प्रोफेसरसाठी 24 जागा, असोसिएट प्रोफेसर पदासाठी नऊ जागा आहेत.)


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवयाचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षा मंडळ बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पोस्ट बॉक्स नंबर-२५, आर्वी रोड, पिपरी, वर्धा- ४४२००१


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2022


तपशील - www.bitwardha.ac.in  (या वेबसाईटवर गेल्यावर quick links मध्ये careers वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने जाहिरात दिसेल.)


महापारेषण, अहमदनगर


पोस्ट - अप्रेंटिस इलेक्ट्रिशियन


शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI


एकूण जागा - 37 


वयोमर्यादा - 18  ते 30 वर्ष


नोकरीचं ठिकाण : अहमदनगरमधलं बाभळेश्वर


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, आउदा संवयु विभाग, 400kV R.S.(O&M) विभाग, बाभळेश्वर, A&P, पिंपरी निर्मळ, ता. राहाता, जि. अहमदनगर


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15  जून 2022 


तपशील - www.mahatransco.in