Bigg Boss 12 : श्रीशांत सहकुटुंब मुंबई विमानतळावर
सलमान खानच्या 'बिग बॉस'चा 12 वा सिझन येत्या रविवारपासून सुरु होणार आहे. या रिअॅलिटी शोमधील संभाव्य स्पर्धकांची नावं समोर येत आहेत. त्यातच क्रिकेटपटू श्रीशांतचं नाव जवळपास निश्चित झालं आहे (फोटो : मानव मंगलानी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रिकेट सोडल्यानंतर श्रीशांतने आपला मोर्चा मनोरंजन विश्वाकडे वळवला. हा त्याचा तिसरा रिअॅलिटी शो आहे. यापूर्वी तो 'झलक दिखला जा 7' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये, तर 'खतरों के खिलाडी 9' या अॅक्शन रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला.
2013 मध्ये आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी श्रीशांत दोषी आढळला होता. त्यानंतर बीसीसीआयने श्रीशांतवर आजन्म बंदी घातली. (फोटो : मानव मंगलानी)
श्रीशांत 12 डिसेंबर 2013 रोजी जयपूरच्या भुवनेश्वरी कुमारीशी विवाहबद्ध झाला होता. त्याची मोठी मुलगी श्री सान्विकाचा जन्म मे 2015 मध्ये झाला, तर 23 नोव्हेंबर 2016 ला श्रीशांतच्या धाकट्या मुलाचा जन्म झाला. (फोटो : मानव मंगलानी)
मुंबई विमानतळावर श्रीशांतचं सहकुटुंब आगमन झालं. त्यामुळे बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठीच श्रीशांत मुंबईला आल्याचं म्हटलं जात आहे. (फोटो : मानव मंगलानी)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -