Zero Hour : आरक्षणावर बैठकीची पवारांची मागणी ते वॉर बीटविन ठाकरे ब्रदर्स झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : आरक्षणावर बैठकीची पवारांची मागणी ते वॉर बीटविन ठाकरे ब्रदर्स झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
मराठा आंदोलकांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही टार्गेट करायला सुरुवात केली... प्रत्येक नेत्यानं मराठा आरक्षणावरची आपआपली भूमिका स्पष्ट करावी... असं म्हणत उद्धव ठाकरेंचा मातोश्री बंगला... शरद पवारांचं पुण्यातील घरावर मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते धडकले...
आज आंदोलक रमेश केरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी मोदी बागेत जावून शरद पवारांची भेट घेतली.. त्यानंतर त्यांनी अनेक मागण्या माध्यमांसमोर ठेवल्यात.. त्या पाहणार आहोतच..
पण महत्वाचे हे कि वर्षभरानंतरही हा संघर्ष शमला नाहीय.. त्यासाठी महायुती सरकारनं नुकत्याच झालेल्या अधिवेशन काळात सर्वपक्षिय बैठकीचं आयोजनं केलं.. पण, त्याचा फायदा झाला नाही.. कारण, बैठकीत विरोधक पोहोचलेच नाही... सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी शरद पवारांच्या सांगण्यावरुन दांडी मारली असा आरोप झाला...आणि आज मात्र त्याच शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठक घ्या अशी सूचना एक पात्र परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना केलीय.