Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे
त्यांचा पक्ष हा भाजपचा अंगवस्त्र आहे
त्यांनी अमित शाहांकडे मागणी करावी
मात्र देवेंद्र फडणवीस त्यंचं ऐकतील असं मला वाटत नाही
शिंदेंनी दुसऱ्याचे आमदार फोडले त्यांना आता आपल्या नगरसेवकांची काळजी वाटते
आमदार फोडून त्यांनी सूरतला नेले होते आणि नगरसेवक मुंबईत कोंडून ठेवले
याचा अर्थ असा की स्वतःच्या राज्यात एकनाथ शिंदेंना नगरसेवक फोडले जाण्याची भीति आहे
ही महाराष्ट्रा्च्या राजकारणातील हास्यजत्रा आहे
किती काळ त्यांना कोंडून ठेवणार..हे नगरसेवक मूळचे शिवसैनिक आहेत
जो शिवसैनिक असतो त्याच्या मनात भाजपचा महापौर होऊ नये हेच त्यांच्या मनात आहे
कोंडून ठेवलं तरी त्यांच्याशी संपर्क होण्याची साधनं आहेतच
मुंबईचा महापौर ठाकरे बंधुंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये अशी सगळ्यांची भावना आहे
देवाची इच्छा असेल तर तो शिवसेनेचा होऊ शकतो
काल राज ठाकरेंची आणि इतर नेत्यांची भेट घेतली
त्यामुळे सध्या आम्ही तटस्थपणे सगळी परिस्थिती पाहतो आहे
महापौरपदावर दावा असण्यापेक्षा आकडे जवळपास समसमान आहेत..केवळ चारचा फरक आहे.
तुमचं बहुमत कितीही मोठं असू द्या..ते चंचल असतं ..ते इथून तिथे कधीही सरकू शकतं
देवेंद्र फडणवीस दावोसमधून गुंतवणूक आणतायत असं म्हणतात
महाराष्ट्रात काही गुंतवणूक दिसत नाही
सगळी गुंतवणूक राजकारणात होते
दावोसला जाऊन महापालिकेचं राजकारण हँडल करतात..मग कशाला जातात
फडणवीसांना हे मान्य होईल का अमित शाह यांचा जो पक्ष आहे, ज्यांचे २९ नगरसेवक आहेत त्यांचा महापौर होईल का
फडणवीस वेताळाप्रमाणे हट्टी आहेत
मुंबईतल्या मराठी मतदाराने आम्हाला मतदान केलं असं फडणवीस म्हणाले मग आमचे 65 आले कुठून..
स्वतःच्याच राज्यात नगरसेवक लपवून ठेवण्याची वेळ येत असेल तर राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे हेच शिंदे दाखवून देतायत
महापौर शिवसेनेचा, ड्युप्लिकेट सेनेचा नाही
ही अमित शहांची सेना आहे..आणि त्यांना त्यांचा महापौर मुंबईत बसवायचा आहे
हे देवेंद्र फडणवीस होऊ देणार नाही
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या काळात नकली सेनेने मुंबई अमित शाहांच्या घशात घातली
राज ठाकरेंना दुर्दैवाने कमी जागा मिळाल्या याचं दुःख सगळ्यांना आहे
आम्ही ठिकठिकाणी मनसेचे उमेदवार निवडून यावे यासाठी प्रयत्न केले
त्यांचे नगरसेवक निवडून आले नाही तरी आम्ही त्यांना लूझर मानत नाही
शिवसेनेतून निवडून आलेले 65 लोक हे मनसेच आहेत आणि मनसेचे निवडून आलेले 6 आमचेच आहेत