Zero Hour Full : राजकारणात काय महत्वाचे? राजकीय महत्वाकांक्षा की परिवार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Full : राजकारणात काय महत्वाचे? राजकीय महत्वाकांक्षा की परिवार?
आज महाराष्ट्राचं राजकारण.. कोणत्या स्तरावर आहे.. हे मी नव्यानं सांगण्याची गरज नाहीय.. म्हणतात ना.. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो.. हेच वारंवार महाराष्ट्रात घडाताना दिसतंय.
कुठे पॉलिटिकल ॲडजस्टमेंट म्हणून... तर कुठे राजकीय भविष्य टिकवण्यासाठी म्हणून.. नेत्यांनी पक्षांतरचं नाही केली.. तर राजकीय घरं दुभंगली.. एका ताटात खाणारे भाऊ... पक्के वैरी बनले.. घर एकच राहीले.. दारांनी मात्र दिशा बदलली.. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर सध्या राज्यात, राजकीय कुटुंबांची स्थिती पाहिली तर,.. बायको एका पक्षात नवरा दुसऱ्या पक्षात.कुठे मुलगा एका पक्षात तर बाप दुसऱ्याच पक्षात. तर कुठे मुलगी एका पक्षात तर बाप दुसऱ्या पक्षात..