Zero Hour Guest Center : लोकसभेच्या उमेदवारी निवडीवर मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव?
abp majha web team
Updated at:
11 Apr 2024 10:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Guest Center : लोकसभेच्या उमेदवारी निवडीवर मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव?
महाराष्ट्र आणि मराठा नेते.. हे नातं.. राज्य निर्मितीपासून आहे.. राज्यात मराठा समाज तीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे आपण मराठा आरक्षणांसदर्भातील सर्वेक्षणातून पुढे आलेल्या आकड्यांमधून पाहिलंय.. गेल्या साठ वर्षांमध्ये राज्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये मराठा मतदारांचाच प्रभाव राहिलाय.. म्हणूनच प्रत्येक निवडणुकांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवार मराठा समाजातून आलेत.. आता तर मनोज जरांगे पाटलांचं राज्यव्यापी मराठा आरक्षण आंदोलन झाल्यानंतर स्थिती आणखी बदललीय.. मराठा समाजाची एकजूट महाराष्ट्रानं पाहिलीय.. त्यामुळेच की काय, मराठा उमेदवारांवर भर दिल्याचं दिसतंय..