Zero Hour : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न?
. बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज नाशिक बंदची हाक दिली... त्यावरुन शहरात दोन जमाव समोरसमोर आले... दगडफेक झाली... तणाव इतका वाढला... की पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला... फक्त नाशिकच नाही तर जळगाव, धुळे, नंदुरबार, इंदापूर, गोंदिया आणि कोल्हापुरातही हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारले होते... त्यातल्या अनेक शहरांमध्ये बंद शांतेत पार पडला.. पण, जिथं जिथं गालबोट लागलं.. तिथं तिथं मात्र, तणाव होता... याचं विश्लेषण करणार आहोतच.. त्याआधी चिंता वाढवणारी आजचं दुसरं कारण..
ते आहे... संभाजी नगरातून... इथं सिटी चौकात मुस्लीम बांधव जमले.. सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटले..त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला ...
रामगिरी महाराजांच्या विरोधात संभाजीनगरच्या सीटी चौक पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं.... रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणीही केली.. गोष्ट तर यापुढे आहे.. इथे आंदोलन होत होते आणि तिथे महाराजांच्या मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले... त्यामुळे आणखीच चर्चा वाढली...