Zero Hour : संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ !
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ ! महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या गंभीर दाव्यावर अशोक चव्हाण स्वतः आपल्या बरोबर असणार आहेत ... त्यांच्याकडून उत्तरं जाणून घेणार आहोत.. ते आपल्यासोबत असणार आहेत.. मात्र, त्याआधी दिवसभरातील काही राजकीय घडामोडी पाहुया.. आता जावूयात सांगलीमध्ये.. जिथं मविआतला तिढा काही केल्या सुटताना दिसत नाहीय.. त्यातच आता खासदार संजय राऊत सांगलीत पोहोचले.. महाविकास आघाडीमध्ये, सांगलीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस, हे दोन्ही पक्ष आपली तलवार म्यान करायला तयार नाहीत.. चंद्रहार पाटील हे सांगलीचे मविआचे उमेदवार आहेत, असं म्हणत ठाकरेंकडून प्रचार जोरात सुरू आहे.. संजय राऊत चंद्रहार पाटलांच्या प्रचाराची तयारी पाहण्यासाठी सांगलीत आलेत.. तर, सांगली आमचीच म्हणत आज पुन्हा एकदा इच्छुक उमेदवार विशाल पाटील.. हे विश्वजित कदमांसह पुन्हा दिल्ली दरबारी डेरेदाखल झालेत.. संजय राऊतांच्या आजच्या या दौऱ्याकडे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली.. दरम्यान काँग्रेसने उमेदवाराला पाठिंबा देऊन पाठिशी उभे राहायला हवे, असे आवाहन राऊतांनी केलं... तर विशाल पाटलांंना संसदेत पाठवण्याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल, असा प्रस्तावही सांगलीत पोहोचताच दिला...ज्यामुळे आता पडद्याआड बऱ्याच हालचाली होत आहेत ह्याचे संकेत मिळाले