Zero Hour Full : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक, काँग्रेस तयार होईल? 21 Nov 2025
Zero Hour Full : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक, काँग्रेस तयार होईल? 21 Nov 2025
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
Sharad Pawar On Raj Thackeray MNS BMC Election 2025 मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती (Shivsena Thackeray Group MNS Alliance) जवळपास निश्चित मानली जात आहे. तर मनसेशी वैचारिक मतभेद असल्यानं मुंबई काँग्रेस यांनी ठाकरे बंधू सोबत न जाता स्वबळावर मुंबईत निवडणूक लढवण्याचा निर्णय एक प्रकारे घेतल्याचा पहायला मिळत आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मिळून निवडणुकीच्या रिंगणात एकत्रित उतरला पाहिजे आणि त्यामध्ये राज ठाकरे (Uddhav Thackeray-Raj Thackeray) हे सुद्धा सोबत असावे यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.
महायुतीविरोधात मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election 2025) जिंकायची असेल तर विरोधकांची वज्रमूठ आणखी घट्ट करून ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे. तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकत्र लढवली पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचं असल्याचं सांगण्यात येत आहे.