Lionel Messi Mumbai Wankhede : फुटबॉल चाहत्यांची आतुरता संपली वानखेडेवर मेस्सीची पहिली झलक!
विश्वविजेता अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आज (रविवार, १४ डिसेंबर २०२५) मुंबईतील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. 'GOAT टूर ऑफ इंडिया' अंतर्गत मेस्सी आज मुंबईत दाखल झाला, आणि त्याचे वानखेडेवर अत्यंत जल्लोषात आणि भव्य स्वागत करण्यात आले.
वानखेडेवर 'प्रोजेक्ट महादेवा' चा शुभारंभ
प्रोजेक्ट महादेवा या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ मेस्सीच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवर करण्यात आला.
या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान मेस्सीने राज्यातील सुमारे ६० शालेय मुलांना फुटबॉलचे धडे दिले आणि त्यांच्यासोबत काही वेळ फुटबॉल खेळून आनंद दिला.
सेलिब्रेटी आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी
अर्जेंटिनाचा हा स्टार फुटबॉलपटू आणि त्याची जादू जवळून अनुभवण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर हजारो चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. संपूर्ण स्टेडियममध्ये जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण होते.
या सोहळ्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री, खेळाडू राहुल भेके यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आणि क्रीडापटू उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या व्यस्ततेनंतर मेस्सी आज संध्याकाळी मुंबईत एका फॅशन शोमध्येही भाग घेणार असल्याची माहिती आ