Zero Hour : महाजन,भुजबळ ते धनंजय मुंडे; मनोज जरांगे कुणाला काय बोलले?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : महाजन,भुजबळ ते धनंजय मुंडे; मनोज जरांगे कुणाला काय बोलले?
राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत असताना.. बीडमध्ये मराठा वादळ पाहायला मिळालं.. मनोज जरांगेंच्या नेतृत्वात शांतता रॅली काढण्यात आली.. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव या रॅलीत सहभागी झाले होते.. जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम अवघ्या काही दिवसांत संपणारय.. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला... ठरलेल्या चार विषयांच्य मागण्या सरकारने पूर्ण न करता फसवलं तर... पुन्हा लढण्यासाठी सज्ज व्हा, असं आवाहन जरांगेंनी केलं... यावेळी बोलताना जरांगेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सरकारसोबत साटंलोटं असल्याचा केलाच.. शिवाय पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल करताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि गिरीश महाजनांवरही तोंडसूख घेतलं प्रचंड गर्दी, मोठा उत्साह आणि सकाळपासूनच मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) भाषणाची उत्सुकता लागलेल्या बीडमधील शांतता रॅलीतून मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही हल्लाबोल केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड (Beed) जिल्ह्यातील नेत्यांना इशारा देत महायुती व महाविकास आघाडीलाही सावधानतेचा इशारा दिला आहे. आपल्या भाषणातून छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागत मराठा समाजालाही (Maratha) एकजूट राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. हिंगोलीतून सुरू झालेल्या शांतता रॅलीला प्रत्येक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज बीडच्या माय-बाप जनतेनं रेकॉर्डब्रेक गर्दी केल्याचं जरांगे यांनी म्हटलं. आपल्य भाषणाच्या शेवटी मराठा समाज बांधवांना जरांगेंनी दोन विनंत्या केल्या आहेत. त्यानुसार, विधानसभा निवडणुकीतही एकजूट दाखवण्याचं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मनोज जरांगे पॅटर्न चालला, त्यातही बीड, जालन आणि परभणी जिल्ह्यात मनोज जरांगेंमुळेच महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या शांतता रॅलीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच, आज जरांगे यांची शांतता रॅली त्यांच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच बीड जिल्ह्यात होती. त्यामुळे, बीडमधील रॅलीतून ते काय बोलतात, कोणावर निशाणा साधतात आणि मराठा समाज बांधवांना काय आवाहन करतात, याची सर्वांनाच उत्सुकता होती. बीडमधून जरांगेंनी मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल करत मराठा समाजालाही विनंती केली आहे. आपल्या भाषणाच्या शेवटी, मी तुम्हाला 2 गोष्टींचं आवाहन करतो, दोन गोष्टीची विनंती करतो असे म्हणत जरांगे यांनी मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.