Zero Hour Full : मुंबईत तिरंगी लढत, काँग्रेसचं स्वबळ,शरद पवार कुणासोबत जाणार? काँग्रेस की ठाकरे?
Zero Hour Full : मुंबईत तिरंगी लढत, काँग्रेसचं स्वबळ,शरद पवार कुणासोबत जाणार? काँग्रेस की ठाकरे?
वर्षाताईंच्या या विधानाचा अर्थ अगदी स्पष्ट आहे... महाविकास आघाडी आता एकत्र लढणार नाही. निदान मुंबईत तरी नक्कीच नाही. संजय राऊतांच्याच दोन महिन्यांपूर्वीचं वाक्य वर्षाताईंनी मिडिया ला सांगितलं, म्हणजे ठाकरेसेना आणि कॉंग्रेस एकत्र लढण्याचा किंवा मनसे महाविकास आघाडी सोबत लढण्याचा विषय, आता संपल्यात जमाय...म्हणजेच आता मुंबईत तिरंगी लढत होणार..पण तुमच्या मनात पुढचा प्रश्न तयारच असेल. की मग काँग्रेस स्वबळावर लढणार की शरद पवारांसोबत? त्यावरही वर्षा गायकवाडांनी स्पष्ट उत्तर दिलंय
काँग्रेसनं शरद पवारांसाठी आघाडीचा दरवाजा किलकिला ठेवलाय.. पण आपल्या या सर्वात जुन्या मित्रपक्षासाठी काँग्रेस किती जागा सोडणार, यावरच महापालिकेत आघाडीचं गणित ठरेल.
बिहार निवडणुकांच्या धांदली दरम्यान, मुंबईतल्या गणिताबद्द्ल ठोस उत्तर कॉंग्रेसकडून येत नव्हतं. पण आज मात्र कॉंग्रेसच्या हालचालींना वेग आला.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आपलं शिष्टमंडळ घेऊन सकाळीच शरद पवारांना भेटल्या. ठाकरे बंधूंसोबत आघाडी करायची नाही, हाच काँग्रेसचा निर्णय आहे, हे त्यांनी पवारांच्या कानावर घातलं. काँग्रेसचे अमित पटेल, अस्लम शेख, पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे बैठकीत हजर होत्या. महापालिका एकत्रच लढावी, अशी आपली इच्छा होती. मात्र कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरत नाही, त्यामुळे स्वबळावर लढणार असं काँग्रेसनं आज स्पष्ट केलंं. आणि एक विषय मार्गी लावून टाकला. पण त्याच बरोबर शरद पवारांकडे मुंबईसाठी प्रस्ताव दिल्याचंही सांगितलं. त्यामुळे पवार काय करणार हा पुढचा प्रश्न आहे. आठवडाभरात शरद पवार पुन्हा बैठक घेतील. आणि त्यावेळी वाटाघाटी कशा होतात, यावर काँग्रेस स्वबळावर लढणार की पवारांसोबत, हे ठरेल...