CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा

Continues below advertisement

CM Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana |मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परभणीत सभा पार पडली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य केलं आहे.  जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचे आहे, असं यावेळी फडणवीस म्हणाले. फडणवीस पुढे म्हणाले की, परभणीच्या विकासाच्या आड जो कुणी येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशिर्वादाने तिथेच नेस्तनाबूत करू. पालकमंत्र्यांचे हात बळकट करा. परभणीत भाजपचा महापौर करा. २०१२ साली परभणी महानगरपालिका झाली.१३-१४ वर्ष झाले महापालिके मूळे नेत्यांची विकास झाला पण लोकांचा नाही परभणीचे नागरिक खूप भोळे आहेत. जगात जर्मनी एन भारतात परभणी म्हणतात पण काय अवस्था आहे परभणीची? परभणीचा एक मोठा इतिहास परंपरा आहे. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनंतरही राजकारण्यांना शहरांचा विसर पडला. लोक शहरात आले मात्र शहराचा विकास रखडला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola