Zero Hour Maharashtra Assembly Election : MVA vs Mahayuti ? जागावाटपावरुन कुणामध्ये जास्त मतभेद?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनमस्कार मी, विशाल पाटील... झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. लोकसभेच्या निकालांचं विश्लेषण पूर्ण होण्याआधीच.. राज्यात विधानसभांना वेग आलाय.. कारण, अवघ्या तीन महिन्यांवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आलीय.. आणि त्यामुळेच राज्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी आपआपल्या पद्धतीनं कामाला सुरुवात केलीय...
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस पक्षासह जवळपास प्रत्येक राजकीय पक्षानं चाचपणी सुरु केलीय.. आणि राजकीय बैठकांनी जोर धरलाय..
भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक आहे.. आणि उद्या महाराष्ट्र प्रभाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपच्या नेत्यांची बैठक असेल...तिकडे आजच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडलीये.. तर आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या पक्षांच्या बैठकांचा धडाकाच लावलाय.. ज्याची सुरुवात पिंपरीमधून झालीये... महायुतीच्या बैठकांचं विश्लेषण करणार आहोतच.. त्याचसोबत आपण महाविकास आघाडीमधील बैठकांचं सत्रही सांगतो..
जिथं शरद पवारांनी कालपासूनच अजित पवारांसोबतच्यांना पुन्हा पक्षात घ्यायला सुरुवात केलीये.. तिथं काँग्रेसनं लोकसभेच्या यशाची विधानसभेत पुनरावृत्ती करण्यासाठी दिल्लीत विषेश बैठकांचं आयोजन केलंय.. तर उद्धव ठाकरेंनी गेल्या आठवड्यापासूनच पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरु केल्यात..
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुती असो की महाविकास आघाडी.. दोन्ही आघाड्यांमधील प्रत्येक पक्षाच्या बैठकीत... विधानसभेच्या जागांवरुन दावेदारी सुरु झाल्याचंही समोर येतंय.. प्रत्येक पक्ष आमूक एक आकडा सांगतोय.. त्यावरुनही संघर्ष होवू शकतो का? की आकड्यांच्या चर्चा फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यापुरत्याच आहेत.. या सगळ्याची चर्चा करणार आहोतच.. मात्र, सुरुवातीला आजचा पहिला प्रश्न... त्यासाठी जावूयात पोल सेंटरला...
बैठकाच्या चर्चेची सुरुवात करुयात भाजपच्या बैठकीनं... महाराष्ट्रात लोकसभेला सर्वाधिक फटका भाजपला बसलाय.. तोच फटका विधानसभेत बसू नये म्हणून पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भाजपनं हालचाली वाढवल्यात.. उद्या पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत अत्यंत महत्वाची बैठक पार पडणार आहे.. त्याआधीच आज राज्यातील नेत्यांची बैठक पार पडली.. सलग दोन दिवस चालवणाऱ्या याच मॅरोथॉन बैठकांमध्ये महाराष्ट्र भाजपचे साठ पेक्षा जास्त पदाधिकारी असणार आहेत.. त्यात मंत्री, नेते, उपनेत, शहर आणि जिल्हाप्रमुख अशांचा समावेश असेल.. आणि याच बैठकांमधून विधानसभेचं विचारमंथन केलं जाईल...भाजपच्या मित्रपक्षांकडून विधानसभांच्या जागांवर दावेदारी सुरु झालीये.. त्यामुळे भाजपच्या याच बैठकांकडे सगळ्याचं लक्ष लागलंय....
विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपची बैठक होत असताना, शिवसेनेचीही वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती.. या बैठकीला मंत्री, नेते, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रवक्ते उपस्थित होते..
या बैठकीत शिवसेनेकडून विधानसभेच्या १०० जागा लढण्याची तयारी सुरू झालीय.. त्यासाठी १०० निरीक्षक आणि तेवढेच प्रभारीसुद्धा नेमण्यात आलेत.. प्रत्येक निरीक्षक आणि प्रभारी त्यांच्यावर जबाबदारी दिलेल्या एकाच मतदारसंघासाठी काम करणार आहेत.. त्याचबरोबर आज घडीला भाजप आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या जागांवर लक्ष द्यायचंही नाही.. याशिवाय बाकी जागांचा विचार करावा...तिथेच लक्ष केंद्रीत करून निवडणुकीची तयारी करणार आहेत.. असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत.. इतकंच नाही तर शिंदेकडून मुंबईत सतरा जागा लढवण्याचा विचार आहे..
सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवा... सदस्य नोंदणीवर भर द्या... शिवसेना युवासेना महिला आघाडी पदावर नेमणूक करा.. असे आदेश आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले... तसंच पक्षांतर्गत वाद, नाराजी तसंच स्थानिक राजकारणाबाबतही माहिती घेण्यात आली...
विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप-शिवसेनेच्या आढावा बैठका, सभा, विशेष मोहीम घेणे सुरू असताना.. महायुतीतला आणखी एक पक्ष राष्ट्रवादीनेही कंबर कसलीय.. लोकसभेत अवघ्या ६ जागा लढलेल्या अजितदादाच्या गटाने, पुन्हा एकदा विधानसभेच्या ८० जागा लढणार असल्याचं जाहीर केलंय.. केवळ एवढंच नव्हे तर कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी, राष्ट्रवादी विदर्भातल्या २० जागा लढवण्याचा विचार करत असल्याचंही सांगितलंय.. राष्ट्रवादीने ८० जागांची घोषणा करण्याची ही पहिली वेळ नाही.. याआधीही अनिल पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनीही.. राष्ट्रवादी ८० ते ९० जागा लढणार असल्याचं वक्तव्य केलं होतं... अजित पवारांनीदेखील पक्षाच्या बैठकीत बोलताना हीच री ओढली होती.. त्यामुळे लोकसभेत महायुतीकडून सर्वात कमी जागा लढणाऱ्या राष्ट्रवादीला, विधानसभेत तरी मागणी केलेल्या जागा वाट्याला येतात का?... लोकसभेच्या निकालांनंतर संघाकडून वारंवार, राष्ट्रवादीशी युतीवरून भाजपला मिळालेल्या कानपिचक्यांनंतर... महायुतीत राष्ट्रवादीचा जागावाटपात योग्य सन्मान राखला जाणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणारय.. दरम्यान धर्मराव बाबा अत्राम यांनी जागावाटपाबाबत नेमका काय दावा केला ते पाहूया...