Zero Hour Guest Center | चॅम्पियन्स ट्रॉफी आता मराठीतच, मनसेच्या खळखट्याकनंतर हॉटस्टारला जाग

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Guest Center | चॅम्पियन्स ट्रॉफी आता मराठीतच, मनसेच्या खळखट्याकनंतर हॉटस्टारला जाग
हॉटस्टारनं मराठी भाषेतून समालोचन का बंद केलं.. याबाबत त्यांच्याकडूनच खुलासा येईल.. पण, याच सगळ्या घडामोडींवर होता आपला आजचा पहिला प्रश्न.. तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला.
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी एक फोटो पोस्ट केलेला .. त्यात समालोचनासाठी आठ भाषांचे पर्याय दिसतायत.. त्यातला पहिला हिंदी... दुसरा इंग्रजी, बंगाली, हरयाणवी, तामीळ, भोजपुरी, तेलुगू आणि
कन्नड भाषांचे पर्याय आहेत.. आणि याच प्रादेशिक भाषांच्या यादीत सगळ्यात तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा पर्याय उपलब्ध नव्हता.. तो म्हणजे आपल्या मायबोली मराठीचा...
आणि हीच बाब मनसे नेते अमेय खोपकर यांनी लावून धरली... आज सकाळी त्यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फौज घेऊन हॉटस्टारचं मुंबईतील कार्यालय गाठलं.. पुढे तब्बल दोन एक तास त्या कार्यालयात वातावरण तापलेलं होतं.. आणि शेवट झाला तो हॉटस्टारच्या ग्वाहीनं... ही ग्वाही होती... अर्थात मराठी समालोचनाची... पण, तीही लेखी हवीय असं म्हणत अमेय खोपकर यांनी आजचं तीव्र केलं.. आणि अखेर हॉटस्टारकडून ते लिखित स्वरुपात दिलं.. आणि त्यानंतर मनसेनं आंदोलन स्थगित केलं.