Zero Hour ABP Majha:युवा संघर्ष यात्रा ते आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा;झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 12 Dec 2023 10:04 PM (IST)
Zero Hour ABP Majha:युवा संघर्ष यात्रा ते आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा;झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा हिवाळी अधिवेशनामुळे नागपूरमध्ये रोज सध्या अनेक मोर्चे निघत आहेत. समाजातील असंख्य लोकांच्या जीवनावर परिणाम करू शकेल असा त्यातील आज एक मोर्चा होता तो म्हणजे जुनी पेन्शन योजना राबवावी ह्यासाठीचा. त्याला राजकीय किनार आली ह्यात फार आश्चर्य नाही. तर दुसरा मोर्चा मात्र राजकीयच होता ... राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या 'युवा संघर्ष यात्रेची सांगता. ह्यात मात्र हाय वोल्टेज draama बघायला मिळाला. या दोन्ही मोर्चांचा आपण आढावा घेणार आहोत..