Zero Hour Harun Khan : दुबार मतदार यादीत जातीचा प्रश्नच नाही,हिंदू काय मुस्लिम नावंही काढा
abp majha web team | 03 Nov 2025 09:18 PM (IST)
दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या चर्चेत शिवसेना (UBT) आमदार हारून खान यांनी भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. 'भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार साहेब कोणताही मुद्दा असो, त्याला हिंदू मुस्लिम रंग देतात', असा थेट आरोप खान यांनी केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीतील त्रुटींवर आवाज उठवल्यानंतर, भाजपने केवळ हिंदू-मराठी मतदारांनाच लक्ष्य केले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना हारून खान यांनी स्पष्ट केले की, हा लढा कोणत्याही विशिष्ट जात-धर्माच्या विरोधात नसून, मतदार यादीतील बोगस नावांच्या विरोधात आहे. मुस्लिम नावांसहित सर्व धर्मांतील दुबार नावे काढण्यात यावीत, अशी मागणीही त्यांनी केली.