CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
"तर्री पोहा विथ देवा भाऊ" खास नागपुरी संकल्पनेसह देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत.8 जानेवारी रोजी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत होणार आहे.या कार्यक्रमात नागपुरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे प्रभावशाली व्यक्तींनाही नागपूरच्या विकासासंदर्भात भाजपचा आणि मुख्यमंत्र्यांचा व्हिजन ऐकण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. या प्रकट मुलाखतीनंतर मुख्यमंत्री नागपूरकरांसोबत "तर्री पोह्या"चा आस्वाद घेणार आहे. यावेळी जनतेच्या काही प्रश्नांची उत्तरेही देवाभाऊ देतील अशी माहिती भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे.दरम्यान 8 जानेवारीला नागपुरात होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत प्रकट आणि लाईव्ह मोडमध्ये असेल. देवा भाऊ ठाकरे बंधूसारखी रेकॉर्डेड आणि नियंत्रित प्रश्नांची मुलाखत देणार नाही अशी उपरोधिक टीकाही दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केली..8 जानेवारी ची मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत शहरातील 50 मोठ्या चौकांवर स्क्रीन लावून हजारो नागपूरकरांना लाईव्ह दाखवण्याची व्यवस्था ही भाजपद्वारे केली जात आहे..