Zero Hour Jayashree Shelke : ठाकरेंनी कर्जमाफी केली, पण फडणवीसांनी फक्त थाप मारली
abp majha web team Updated at: 05 Nov 2025 10:10 PM (IST)
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गट आणि भाजप सरकारमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. 'इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफीची थाप जर कोणी मारली असेल तर ती आजच्या महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी मारली आहे,' असा थेट आरोप ठाकरे गटाच्या प्रतिनिधींनी चर्चेदरम्यान केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेद्वारे कोणताही गाजावाजा न करता शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली, असे त्यांनी सांगितले. याउलट, 'सातबारा कोरा करू' असे आश्वासन देऊनही फडणवीस सरकार ते पूर्ण करण्यासाठी मुहूर्त का शोधत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या कापसाचे भाव २०२० मधील ११,००० रुपयांवरून ६,००० रुपयांपर्यंत घसरले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ५ नोव्हेंबरपासून दौऱ्यावर आहेत.