Zero Hour Phaltan Case : फलटण डॉक्टर प्रकणावरुन अंधारेंचा एल्गार, तर राष्ट्रवादीत चाकणकर vs ठोंबरे
abp majha web team | 03 Nov 2025 09:46 PM (IST)
‘झिरो अर’ मध्ये आज चर्चा फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून तापलेल्या राजकारणाची. या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट फलटण पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यात संघर्ष पेटला आहे. 'आयोगाच्या चुकीच्या वक्तव्यामुळे पक्ष बदनाम झाला, चाकणकरांनी राजीनामा द्यावा', अशी थेट मागणी रुपाली ठोंबरेंनी केली आहे. सुषमा अंधारेंनी एसआयटीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांना जाब विचारला आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली. या सर्व गदारोळात, पीडितेसाठी न्यायाच्या मागणीकरिता मुंबई, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले, ज्यामुळे आरोग्यसेवेवरही परिणाम झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी तपासाची घोषणा केली आहे.