Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार

Continues below advertisement

नागपूर : शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळा जाऊन शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेत नागपूरच्या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? असा सवाल उपस्थित केला. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर अल्पसंख्यांकांच्या व्होटबँकेसाठी केलेल्या टीकेवरूनही पलटवारदेखील केला. कोण होतास तू, काय झालास तू.. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. यावेळी, अमित शाह (amit shah) यांच्या संसदेतील भाषणाचा व्हिडिओ देखील फडणवीसांनी शेअर केला होता. त्यावर, भ्रष्टाचारी लोकांना पांघरुनात घेतलास तू असे म्हणत पलटवार केला. 

मला मुख्यमंत्र्यांची दया येते की कोण होतास तू काय झालास तू, एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना जवळ घेतलंस तू,स्वत:च्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू काय झालास तू, भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलंस तू असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिलं. तसेच, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, असेही ते म्हणाले.  

अमित शाहांवर पलटवार

अमित शाह खूप हिंदुत्ववादी आहेत, त्यांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. संघांनी तर मला शिकवूच नये, वंदे मातरमची तुम्ही चर्चा करताय, असे म्हणत अमित शाहांवर निशाणा साधला. तसेच, अमित शाह तुमच्या मंत्रिमंडळात किरण रिजीजू जे मंत्री आहेत ते म्हणतात मी गोमांस खातो. 9 डिसेंबरचा हा फोटो आहे, त्यांच्यासोबत ते जेवण करत आहेत. तुम्ही हिंदुत्ववादी म्हणताय मग गोमांस खाणाऱ्या मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घेणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी अमित शाहांनी विचारला. तसेच, माझ्यावर बोलण्याआधी तुम्ही तुमच्या बुडाखालचं हिंदुत्व बघावं, मंदिराच्या परिसरात प्रकाश दिवा लागला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आम्ही न्यायाधीशांविरोधात महाभियोग आणला. कारण, त्यांची आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्त आहे, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले. अमित शाह यांचा मुलगा जय शाह पाकिस्तानसोबत भारताला खेळायला लावतो. आता तुम्ही सांगा? जय शाह हिंदुत्ववादी नाही म्हणून तो पाकिस्तानसोबत खेळायला लावता का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola