Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
दक्षिण भारतातील कार्तिकेय स्वामीच्या एका मंदिरावरुन हिंदू मुस्लिम वादाचं राजकारण सुरु असतानाच याची धग आता महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचलीय...कार्तिकेय स्वामींच्या मंदिराबाबत उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी संसदेत कठोर हल्ला चढवला....याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी शाहांना सुनावलंय...अमित शाह, भाजप आणि संघानं आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर हल्लाबोल केला...विशेष म्हणजे यावेळी किरेन रिजीजूंचा दाखल देत त्यांनी शाहांसोबत रिजिजूंचा जेवतानाचा फोटो दाखवला....हिंदुत्वाचा अजेंडा रेटताना त्यांनी थेट गोमांस सेवनाचा मुद्दा पुढे केला....यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या शिलेदारांनी उद्दव ठाकरेंवर जोरदार तोंडसुख घेतलं...मात्र निवडणुकांच्या तोंडावर हिंदुत्वाचं कार्ड पुन्हा एकदा बाहेर निघणार, आरोप-प्रत्यारोपांची राळ उठणार आणि शेवटची जनतेच्या हाती काहीच नाही लागणार हेच अंतिम सत्य आहे...