Zero Hour Gajanan Kale vs Navnath Ban : मतदारयाद्यांच्या घोळावरुन काळे-बन आमनेसामने
abp majha web team | 30 Oct 2025 09:50 PM (IST)
मतदार याद्यांमधील घोळ, बोगस मतदार आणि ईव्हीएमच्या (EVM) मुद्द्यावरून मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) आणि भाजप प्रवक्ते नवनाथ भने (Navnath Bhane) यांच्यात जोरदार चर्चा झाली. 'लोकसभेला महाविकास आघाडी जिंकते तेव्हा ईव्हीएमबद्दल शंका नसते आणि विधानसभेला भाजप जिंकली की मग मात्र ईव्हीएम खराब, ही नौटंकी विरोधकांनी बंद केली पाहिजे', असे म्हणत नवनाथ भने यांनी विरोधकांवर टीका केली. मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष तपासणी मोहीम (SIR) राबवण्याच्या मागणीला गजानन काळे यांनी पाठिंबा दर्शवला, मात्र त्यात केवळ दुबार नावेच नव्हे, तर परराज्यातून आलेले खोटे मतदार आणि बांगलादेशी घुसखोरांची नावे वगळण्याची मागणीही केली. ईव्हीएम हॅक करण्याचं निवडणूक आयोगाचं खुलं आव्हान आजवर एकाही पक्षाला स्वीकारता आलेलं नाही, असंही भने यांनी नमूद केलं. मात्र, एसआयआरच्या मागणीला पाठिंबा दिला तरी मनसेच्या १ नोव्हेंबरच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.