Zero Hour Yogesh Kedar : मराठा समाजाची भूमिका न समजून घेत लक्ष्मण हाके काहीही बरळतात
abp majha web team | 17 Sep 2025 09:14 PM (IST)
‘दि डिस्कशन’ कार्यक्रमात एका वक्त्याने हाकेंवर बोलताना आचार्य अत्रेंच्या शब्दांत घणाघाती टीका केली. “गेल्या दहा हजार वर्षात अशी पैदास जन्माला आलेली नाही जो दुसऱ्याच्या बापासाठी स्वतःच्या निशा काढून फिरतोय,” असे ते म्हणाले. मराठा समाजाची भूमिका न समजून घेता हाके काहीही बोलत सुटले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. वक्त्याने हाकेंचा मराठवाडा मुक्तिसंग्रामाशी काय संबंध आहे, असा थेट प्रश्न विचारला. मराठवाड्यातील मराठा, ओबीसी आणि दलितांनी किती त्रास सहन केला आहे, याची हाकेंना कल्पना नाही, असे ते म्हणाले. आपल्या आजोबांनी संग्रामात दोन वर्षे सक्तमजुरी भोगली आणि घराची वाताहत झाली, अशी माहिती त्यांनी दिली. यानंतर, ओबीसी नेते या संघर्षात एकत्र का दिसत नाहीत, असा प्रश्नही चर्चेत उपस्थित करण्यात आला.