Zero Hour Voter List Row : मतदार याद्यांवरुन रणकंदन, विरोधकांचे गंभीर आरोप
abp majha web team Updated at: 27 Oct 2025 08:58 PM (IST)
महाराष्ट्रात मतदार याद्यांमधील (Voter Lists) कथित घोटाळ्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गंभीर आरोप केले आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 'या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून कव्हर फायरिंग (Cover Firing) म्हणून आधीच अशा प्रकारचं वातावरण ते तयार करताहेत', असा थेट हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी पुरावे सादर करत, लोकसभा निवडणुकीवेळी मतदार यादीतून नावे गायब करून विधानसभा निवडणुकीत पुन्हा समाविष्ट केल्याचा दावा केला आहे. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ नोव्हेंबरच्या मोर्चासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहारनंतर आता देशभरातील १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादी फेररचनेची मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे.