Zero Hour Maharashtra Local Body Election : मिनी विधानसभेचा रणसंग्राम; कोण मारणार बाजी?
abp majha web team | 04 Nov 2025 09:26 PM (IST)
एबीपी माझाच्या 'झिरो अवर' या कार्यक्रमात सूत्रसंचालक पूर्वी व्हावे यांनी राज्यात जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणसंग्रामावर चर्चा केली. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केल्यानुसार, पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होईल. 'दोन किंवा त्यापेक्षा अधिक याद्यांमध्ये नाव असेल तर त्या मतदाराच्या नावापुढे दोन स्टार दिले जातील आणि अशा मतदारांकडून डिक्लरेशन लिहून घेण्यात येईल,' अशी महत्त्वपूर्ण माहिती वाघमare यांनी दिली. या निवडणुकीत दुबार मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने खास प्रणाली विकसित केली आहे. मतदान EVM वर होणार असले तरी VVPAT ची सुविधा उपलब्ध नसेल. मतदारांच्या सोयीसाठी नवीन ॲपची निर्मिती करण्यात आली असून, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ३२ विशेष मोहीम राबवण्यात येणार आहेत. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि लहान बाळं असलेल्या महिलांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.