Zero Hour Kishor Jorgewar on Election : मशीन घ्या आणि आम्हाला पटवून द्या; भाजपचं विरोधकांना आव्हान
abp majha web team | 04 Nov 2025 09:42 PM (IST)
ईव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, या चर्चेत भाजपच्या वतीने किशोरजी आणि उत्तमराव जानकर सहभागी झाले आहेत. निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित करणे हे हास्यास्पद असल्याचे मत भाजपच्या किशोरजी यांनी मांडले. चर्चेदरम्यान, किशोरजी यांनी उत्तमराव जानकर यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली, 'त्यांचं जे संभाषण आहे, त्यांचा जो मुद्दा आहे हा भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला न पटण्यासारखा आहे.' जिंकल्यावर लोकशाहीचा विजय आणि पराभव झाल्यावर मतचोरीचा आरोप करण्याच्या दुटप्पी भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करण्याचे आव्हान दिले होते, मात्र त्यावेळी कोणीही पुढे आले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भारतातील मतदार चोखंदळ असून, प्रत्येक निवडणुकीत तो वेगवेगळ्या मुद्द्यांवर विचार करून मतदान करतो, असेही ते म्हणाले.