Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा

Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा

एमआयएमचे खासदार असउद्दीन ओवेसी यांची जाहिरसभा पार पडली.. यावेळी त्यांनी अमरावतीच्या भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर हिंदूंनी चार मुलं केले पाहिजे या वक्तव्यावर जोरदार टिका केली.. ओवेसी म्हणाले की, कोणीतरी म्हणाला याठिकाणी मौलाना किती मुलं करा म्हणे.. 19 मुलं करतात म्हणे.. मौलाना यांना मला भेटावं लागेल.. तुम्ही चार नाही आठ करा.. आम्हाला काय करायचं.. मोहन भागवत म्हणतात मुलं जन्माला घाला.. तुम्हाला मी सांगतो करा 19 मुलं... असं ओवेसी म्हणाले..

तसंच ओवेसी यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर सुद्धा टिका केली.. जे काकांचा नाही झाला ते आपलं काय होणार.. आणि काहीजण म्हणतात अजितदादा आमचं काम करणार.. आता घडीची वेळ गेली आणि पतंगची वेळ आली असं ओवेसी म्हणाले..

यावेळी लव्ह जिहादवर सुद्धा ओवेसी यांनी म्हटलं की, सरसंघचालक मोहन भागवत साहेब आपण लग्न केलं नाही..  लव्ह जिहाद म्हणजे काय मग.. नागपुरात किती लव्ह जिहाद झाले.. कायद्याचं काय झालं ?...असा सवाल त्यांनी उपस्थित केला...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola