Zero Hour Delhi Terror Attack : लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, कटामागे उच्चशिक्षित डॉक्टर्स?
abp majha web team | 11 Nov 2025 09:30 PM (IST)
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाने (Car Bomb Blast) देश हादरला आहे. या हल्ल्यात डझनभर नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला असून, यामागे पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे. या कटात अनेक उच्चशिक्षित डॉक्टर सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान दौऱ्यावरून या हल्ल्याच्या सूत्रधारांना कठोर शब्दांत इशारा दिला आहे. 'हमारी एजन्सी ईस षड्यंत्र की तह तक जाएगी, इसके पीछे के षडयांत्रकारियो को बक्सा नाही जायगा', असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेस नेते नाना पटोले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या सुरक्षेतील त्रुटींवरून टीका केली आहे.