Zero Hour Atul Londhe : देशाच्या सुरक्षेवरुन प्रश्न उपस्थित केल्यास वाईट वाटण्याचं कारण काय?
abp majha web team Updated at: 11 Nov 2025 09:42 PM (IST)
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. '26/11 च्या वेळी आमच्या नेत्यांनी राजीनामे दिले, पण आता पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीचे उपाध्यक्षपद मिळते,' असा थेट सवाल लोंढे यांनी केला. चर्चेदरम्यान लोंढे यांनी पुलवामा हल्ला, पठाणकोट एअरबेसवर चौकशीसाठी पाकिस्तानी आयएसआय टीमला दिलेली परवानगी आणि देशाच्या सार्वभौमत्वाच्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. २६/११ च्या हल्ल्यावेळी नरेंद्र मोदी स्वतः हॉटेलबाहेर पत्रकार परिषद घेत होते, याची आठवण करून देत त्यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधी पक्षाचे काम देशाच्या सुरक्षेवर प्रश्न विचारणे हेच आहे आणि ते आम्ही करत राहणार, असेही ते म्हणाले. पाकिस्तानला FATF च्या ग्रे लिस्टमधून बाहेर काढल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्ज मिळत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.