Vaare Nivadnukiche : राज्यातील निवडणुकीच्या बातम्या एका क्लिकवर : वारे निवडणुकीचे : 31 August 2024

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच भाजपची १५० पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका, जागेच्या हट्टापेक्षा जिंकण्याची शक्यता असलेल्या पक्षाने ती जागा लढवावी अशी आमची भूमिका, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य.
राष्ट्रवादी महायुतीत६० हून अधिक जागा घेण्याच्या तयारीत, राष्ट्रवादीचे ५४ आमदार, काँग्रेसचे तीन आणि अपक्ष तीन आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य,.
पहिल्या टप्प्यात जिथे उमेदवार निवडून आले तिथे जाणार, आणि निवडून येणाऱ्याला तिकीट देणार, हाच जागावाटपाचा निकष, अजित पवारांकडून स्पष्ट.
राष्ट्रवादी बरोबर दुर्दैवी युती, असंगाशी संग केला, भाजप प्रवक्ते गणेश हाकेंचं वक्तव्य, लोकसभेत राष्ट्रवादीने युती धर्म पाळला नाही म्हणूनच लातूरमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याचाही हाकेंचा आरोप.
गणेश हाकेंसारख्या विद्वान माणसाच्या ज्ञानाचा भाजप उपयोग करत नाही, त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी हाकेंनी वक्तव्य केलं असावं, अमोल मिटकरींचा टोला.
भाजप शिवसेना सख्खे तर राष्ट्रवादी सावत्र भाऊ, राष्ट्रवादीशी युती करुन भाजपचं वाटोळं झालं, लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांची टीका.
अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्या यवतमाळच्या पूसदमध्ये, पारध मैदानात होणार अजितदादांची सभा, आमदार इंद्रनील नाईक यांची माहिती.