चहा प्यायल्यानंतर कपही खायचा! झिरो वेस्ट तत्वावर कोल्हापूरच्या तीन इंजिनिअर्सने केली कपची निर्मिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Feb 2021 10:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर शहरात आता चहा पिऊन झाल्यावर कप टाकायचा नाही तर खायचा आहे. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक कपला पर्याय म्हणून हे कप तयार करण्यात आलेत. कोल्हापूरच्या दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या तीन इंजिनिअर युवकांनी सुरु केलेल्या 'मॅग्नेट एडिबल कटलरी' या ब्रँड मार्फत उपलब्ध करण्यात आले आहेत. काही कारणाने नाही खाऊ शकलो तर आपण इतरत्र फेकले तरी भटकी जनावरे ते खाऊन पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच त्यांचीही भूक भागविण्याचे काम होते, हे कप 'झिरो वेस्ट' या तत्वावर हे तयार करण्यात येत आहेत.