Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतही कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत आलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अमरावतीतल्या गुरूकुंज मोझरीत तिवसाचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्यासाठी सभा घेतली. त्यात त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत बटेंगे तो कटेंगेचा इशारा दिला. जर हिंदू एकत्र राहिले तर शोभायात्रेवर दगडफेक करायची कुणाची हिम्मत होणार नाही, असं ते म्हणाले...नवनीत राणा यांच्या हनुमान चालिसावरून झालेल्या वादाचं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं.
अमरावती : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारातोफा धडाडत असून पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम मुद्दा ऐन निवडणुकीत समोर आलाय. तर, देशपातळीवरील नेतेही महाराष्ट्रात प्रचाराला येत आहेत, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावतीमध्ये भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा होत असून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी येथील व्यासपीठावरुन पुन्हा एकदा एमआयएमचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसींवर पलटवार केला आहे. अकबरुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा 15 मिनिटांचा पुर्नउच्चार केला. ओवैसी यांनी प्रचाराच्या त्यांच्या पहिल्या भाषणात वेळेचा उल्लेख करताना ते म्हणाले, 10 वाजताची वेळ आहे. आता 9.45 वाजतायत. अजून 15 मिनिट उरले आहेत. सभेला आलेल्या लोकांना ते म्हणाले, अरे भाई.. 15 मिनिट उरले आहेत. संयम ठेवा. ना मी त्यांचा पिच्छा सोडणार ना ते माझा सोडणार... चल रही है मगर क्या गूंज है." असं अकबरुद्दीन म्हणाले होते. त्यावरुन, नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पलटवार केलाय.
भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणाने पुन्हा एकदा ओवैसींवर हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांवेळी त्यांनी हैदराबादमध्ये जाऊन ओवैसींवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर, आता योगी आदित्यनाथ यांच्यासमोर भाषण करताना अकबरुद्दीन ओवैसींना इशारा दिलाय. ''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद बाकी आहेत, असे म्हणत माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणांनी अकबरुद्दीन ओवैसींना इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ मंगळवारी संभाजीनगरमध्ये ओवैसी बंधूंची सभा होती. त्यावेळी, सभेत बोलातना छोटे ओवेसी म्हणाले की, मेरी घडी मे पावणे दस हो रहे, अब सिर्फ 15 मिनिट बाकी है.. त्यावरुन नवनीत राणांनी अकबरुद्दीन ओवैसींवर हल्लाबोल केला आहे. अरे तू हैदराबादवरुन आला आणि सांगतो की माझ्या घड्याळात 15 मिनिट बाकी आहेत अरे माझ्या घडीत फक्त फक्त 15 सेकंद आहेत,'' अशा शब्दात नवनीत राणा यांनी ओवैसींना पुन्हा इशारा दिला आहे.