Shabina Jiwaji :मुस्लिम कुटुंबात जन्म,लाटा झेलणारी मच्छिमाराची लेक,मर्चंट नेव्हीत मराठी मुलीचा झेंडा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडहाणू ते डेन्मार्क मर्चंट नेव्ही हे असं क्षेत्र आहे जिथे आकर्षक पगाराच्या बदल्यात तुम्हाला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. सलग सहा सहा महिने समुद्रावर प्रवास, सोशल लाइफला मुरड घालावी लागणं आणि जगभरातील हवामानाशी जुळवून घेत प्रवास करावा लागणं ही या क्षेत्रातील प्रमुख आव्हानं... मर्चंट नेव्हीच्या या खडतर क्षेत्रात जगभरात महिलांचं प्रमाण २ टक्के आहे, तर भारतात केवळ ०.५ टक्के. यावरूनच हे क्षेत्र महिलांसाठी किती आव्हानात्मक आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. आणि अशा क्षेत्रात डहाणूतली एक मराठी मुलगी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतेय. तिचं नाव शबिना.. डहाणूच्या मराठी मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेली मच्छीमाराची ही लेक आज डेन्मार्कच्या ‘टॅार्म ‘ या शिपिंग कंपनीत सेंकड इंजिनीअर या जबाबदारीच्या पदापर काम करतेय. समुद्राच्या लाटांवर स्वार होण्याचे आव्हान स्वीकारत शबीना या क्षेत्रात दाखल झाली. मुस्लिम समाजातील चौकटी भेदत तिचा प्रवास हा आणखी कौतुकास्पद ठरतो. शबिनाचा हाच प्रवाहविरुद्धचा प्रवास एबीपी माझा’वर महिला दिनाच्या निमित्ताने…