JVLR Tree Cutting | मुंबईत 728 झाडांवर कुऱ्हाड? आरे वाचवणारं सरकार वृक्षतोड टाळणार का?
वेदांत नेब, एबीपी माझा | 04 Jan 2021 11:43 PM (IST)
एकीकडे आरेमध्ये पर्यवरणाचा विचार करत आरे कारशेड वाचवणारे ठाकरे सरकार जेव्हीएलआर रुंदीकरण आणि मेट्रो कामासाठी 700 पेक्षा अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवणार का ? असा प्रश्न समोर आलाय. याच कारण म्हणजे जेव्हीएलआर रोडवरील रुंदीकरण सुरू असताना त्यामध्ये येणाऱ्या झाडांवर वृक्ष प्राधिकरण विभागाने हरकती मागवून सुद्धा नोटीस चिटकवल्या आहेत. मात्र, या वृक्षतोडीच्या प्रस्तावाला स्थानिकांनी, पर्यावरण प्रेमीनी विरोध दर्शविला आहे.