Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
घायल हू इसलिये घातक हू... धुरंदर चित्रपटातल्या या गाजलेल्या डायलॉगचा उच्चार करत शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपवर सडकून निशाणा साधला. सोलापूर जिल्ह्यात भाजपची वाताहत झाल्याचा संदर्भ देत आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तयारीला लागण्याचे आवाहनही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले. अकलूज नगरपालिकेच्या विजयानंतर कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर तुफानी टोलेबाजी केली. भाजपचा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा अकलूज करमाळा कुर्डूवाडी आणि सांगोला अशा सहा ठिकाणी दणदणून पराभव झाला आहे. याचाच संदर्भ घेत सोलापूर जिल्हा हा स्वाभिमानी आहे कोणाची हुकूमशाही चालवू देत नाही आणि त्यामुळेच लोकसभा विधानसभा आणि आता नगरपालिकेत सलग तिसऱ्यांदा भाजपाला सणकून दणका दिला असल्याची आठवण धैर्यशील मोहिते पाटील यांनी करून दिली.