आटपाडीचा डाळिंब उत्पादक उध्वस्त, डाळिंब उत्पादकांना सरकार दिलासा देणार? दौरे झाले पण मदत कधी? #FarmerLoss
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2020 09:49 PM (IST)
शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करणारचं आहे. परंतु केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. टोलवाटोलवी नको आहे, राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावे अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.