T20 World Cup Special Report : टी - 20 सामन्यात टीम इंडिया फायनल गाठणार ?
abp majha web team | 09 Nov 2022 11:28 PM (IST)
रोहित शर्माची टीम इंडिया ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारणार का, या प्रश्नाचं उत्तर उद्या अॅडलेड ओव्हलवर मिळणार आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला जॉस बटलरच्या इंग्लंडशी होईल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी दीड वाजता सुरु होईल. पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले आणि गौरव जोशी यांच्या क्रिकेट गप्पा.