दार्जिलिंगच्या गोरख्यांना का हवंय वेगळं राज्य?पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे गोरखालॅन्ड पुन्हा चर्चेत
अमोल किन्होळकर | 16 Apr 2021 12:16 AM (IST)
पश्चिम बंगालच्या पर्यटनाचं सर्वात मोठं केंद्र दार्जिलिंग आहे. इथे जगभरातले पर्यटक येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू येतो, पण तो आमच्यावर खर्च होत नाही, या भागाच्या विकासाकडे लक्ष दिलं जातं नाही. आधीचं डावं सरकार असेल किंवा आताचं ममता बॅनर्जींचं सरकार असेल. या सगळ्यांनीच दार्जिलिंगसोबत दुजाभाव केला असा इथल्या लोकांचा उघड उघड आरोप आहे. त्यामुळे मतपेटीमधून इथला गोरखा कोणाला निवडतो ते पाहावं लागेल.