आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्यांनाच उशीर का झाला? NDRF कोकण, साताऱ्यात वेळेत का पोहोचली नाही?
गणेश ठाकूर, एबीपी माझा Updated at: 24 Jul 2021 10:58 PM (IST)
राज्यात विविध ठिकाणी एनडीआरएफच्या एकूण 25 तुकड्या बचावकार्य करत आहेत. यात मुंबई 2, पालघर 1, ठाणे 2, रायगड 1, रत्नागिरी 6, सिंधुदुर्ग 2, सांगली 2, सातारा 3, कोल्हापूर 4, पुणे 2 अशा तुकड्या कार्यरत आहेत. भुवनेश्वरहून मागविलेल्या 8 तुकड्या या कोल्हापूर 2, सातारा 1, सांगली 2 इथे तैनात केल्या जातीत तसेच 2 तुकड्या पुणे येथे राखीव असतील. सोबतच तटरक्षक दलाच्या 3 , नौदलाच्या 7, लष्कराच्या 3 तुकड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथे कार्यरत आहेत. एसडीआरएफच्या नागपूरसाठी 2 आणि या रायगड जिल्ह्यासाठी 2 अशा 4 तुकड्या कार्यरत आहेत.