सौरभ आणि मनूची पदकं का हुकली?वेळीच हस्तक्षेप न करता एनआरएनं प्रशिक्षक राणांसोबतचा वाद का चिघळू दिला?
संदीप चव्हाण Updated at: 01 Aug 2021 09:05 PM (IST)
Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची नेमबाजीत कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. मनु भाकरकडून तीन स्पर्धांमध्ये भारताला पदकाची अपेक्षा होती. पण मनु भाकर कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र ठरू शकली नाही. मनु भाकरने तिच्या खराब कामगिरीवर आपले मौन सोडले आहे आणि पराभवाचे खापर माजी प्रशिक्षक जसपाल राणा यांच्यावर फोडले आहे.