Marathi School : मराठी पालकवर्ग इंग्रजी शाळांकडे का झुकतोय? विद्यार्थ्यांची पटसंख्या का घटतेय?
वेदांत नेब, एबीपी माझा | 12 Nov 2021 07:41 PM (IST)
मुंबई : एकीकडे राज्यात आणि मुंबईत मराठी भाषेचे जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असताना, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुरु असताना दुसरीकडे 'आपुल्या घरात हाल सोसते मराठी' असाच काहीसा प्रकार झाल्याचं समोर आलंय. 'एबीपी माझा'च्या रिपोर्टमधून असं समोर आलं आहे की मुंबईतील मराठी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संख्येत मोठी घसरण होत आहे. तुलनेत पालकांचा कल हा इंग्रजी शाळांकडे असल्याचं चित्र आहे. तसेच मुंबईत हिंदी आणि उर्दू शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या ही मराठीच्या जवळपास दुप्पट असल्याचंही समोर आलं आहे. यासाठी 'एबीपी माझा'ने 'मराठी शाळा वाचवा' ही मोहीम सुरु केली आहे.