Dharavi Adani Opposition Special Report : पुनर्विकासाला धारावीकरांचा विरोध का?
abp majha web team
Updated at:
17 Jul 2023 11:29 PM (IST)
धारावी... अडीच चौरस किलोमटरवर वसलेली झोपडपट्टी... आणि इतक्या छोट्या क्षेत्रफळामध्ये माणसं राहतात तब्बल १० लाख... एका उंबऱ्यातून जोरात उडी मारली की समोरच्या घरात एण्ट्री होईल, इतक्या छोट्या गल्ल्या... आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख... खरंतर, याचा अभिमान वाटावा की खेद... हेही अद्याप समजलेलं नाही... मात्र आता धारावीचं रुपडं बदलणारेय... झाडून सगळ्या धारावीचा आकार आणि उकार बदलला जाणारेय... आणि हे करणार आहे देशातला बलाढ्य उद्योगसमूह... अर्थात अदानी ग्रुप.