Kirit Somaiya Special Report : खरी अडचण तर सोमय्यांची झालीये? अब तेरा क्या होगा सोमय्या?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडी सरकारचा अडीच वर्षांचा काळ सुखानं जाऊ न देण्यात सगळ्यात मोठा वाटा होता तो किरीट सोमय्यांचा.. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतल्या कित्येक आमदारांवर किरीट सोमय्यांनी आरोप केले.. काही आमदारांविरोधात कागदपत्रही दाखल केली आणि सुरु झाला चौकशीचा ससेमिरा.. पुढे एकनाथ शिंदेंनी बंड केलं, महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि सोमय्यांनी आरोप केलेले काही आमदार एकनाथ शिंदेंसोबत जात सत्तेत सहभागी झाले. साहजिकच सोमय्यांची या नेत्यांवर होणारी टीका थांबली…पुढे सोमय्यांचा मोर्चा राष्ट्रवादीकडे वळला... पण आता राष्ट्रवादीतही बंड झालं आणि ज्यांच्यावर सोमय्यांनी आरोपांचं बोट ठेवलं त्यांनीच भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली... त्यामुळे सोमय्यांची आता चांगलीच अडचण होणार असं दिसतंय