Maharashtra Congress President| महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणत्या नेत्याची वर्णी लागणार?
प्रशांत कदम, एबीपी माझा | 05 Jan 2021 12:00 AM (IST)
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये मुंबईचा अध्यक्ष बदलल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु होती. आज त्याबाबत एक महत्वाची राजकीय घडामोड घडलीय. बाळासाहेब थोरात हे सध्या राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असून आज दिल्लीत त्यांनी पक्ष संघटनेतल्या काही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करुन आपली भूमिका कळवली आहे. बाळासाहेब थोरातांनी हे पाऊल नेमकं का उचललं? त्यांचा राजीनामा मंजूर होणार का? नवीन प्रदेशाध्यक्ष मग कोण होणार? अशी सगळी चर्चा त्यामुळे सुरु झालीय.